Pune Crime : पुण्यात नेमकं काय चाललंय? आता फूटपाथवर झोपण्याच्या वादातून खून, खडकीत ज्येष्ठ वृद्धाला जागीच संपवलं…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. Pune Crime

पदपथावर झोपण्याच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

विकास रामचंद्र गायकवाड (वय ५२, रा. खडकी बाजार) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, मंगेश भागाजी भद्रिके (वय ७५, रा. खडकी रेल्वे स्थानकासमोर) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी फिर्याद दिली.

मिळालेल्या माहिती नुसार, भद्रिके आणि गायकवाड खडकी बाजार परिसरात किरकोळ कामे करीत होते. दोघे जण खडकी रेल्वे स्थानकासमोर पदपथावर राहत होते. पदपथावर झोपण्याच्या जागेवरून दोघात वाद झाला होता. आरोपी गायकवाड दारू पिऊन आला.

झोपेत असलेल्या भद्रिके यांच्यावर त्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या भद्रिके यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पसार झालेल्या गायकवाडला पोलिसांनी अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!