Pune Crime : उसण्या पैशांवरुन वाद, जांभुळवाडीत पीएमपी चालकाचा खून, दोघा मित्रांना बेड्या..
Pune Crime पुणे : दारु पित बसले असताना उसने दिलेल्या पैशाच्या वादातून दोघा मित्रांनी पीएमपी चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (ता. १६) पहाटे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime)
राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय ५६, रा. जांभुळवाडी) असे खून झालेल्या पीएमपी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार (वय ३०, रा. जांभुळवाडी) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय. २०, रा. धनकवडी) या दोघांना अटक केली आहे
मिळालेल्या माहिती नुसार, राजेंद्र दिवेकर व आरोपी हे दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात उसने दिलेल्या पैशांवरुन वाद झाला. त्यात दोघांनी धारदार शस्त्राने दिवेकर यांचा खून केला. (Crime News)
दरम्यान, पती रात्रभर घरी न आल्याने त्यांची पत्नी पहाटे त्यांचा शोध घेत होती. त्यावेळी त्यांना दिवेकर यांचा खून झाल्याचे समजले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.