Pune Crime : दाजीचा खून करुन मेव्हण्याची आत्महत्या, पुण्यातील घटनेने उडाली खळबळ


Pune Crime पुणे : पुण्यातील बाणेर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दाजीचा खून केल्यानंतर मेव्हण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता.१२) पुण्यातील बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटी धील फ्लॅट नं. 201 येथे घडला आहे. (Pune Crime)

धनंजय साडेकर (वय. ३८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर हेमंत काजळे (वय.४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, श्री समृद्धी सोसायटी बाणेर येथे हेमंत काजळे यांनी त्यांचा दाजी धनंजय साडेकर याचा लोखंडी रॉड डोक्यात मारून खून केला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी हेमंत यांनी बहिनीस धनंजयचा खून केला असून स्वतः आत्महत्या करत असल्याचे कळवले होते. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!