Pune Crime : पुण्यात धक्कादायक घटना! सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य, नराधम बापाला बेड्या..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील वडगवा शेऱी येथे सावत्र बापाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आहे. ही घटना गुरुवारी (ता.२२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घडली आहे.
याप्रकणी १७ वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ४८ वर्षीय सावत्र बापावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी पीडित मुलाचा सावत्र बाप आहे. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगी अंघोळ करु किचनमध्ये कपडे बदल होती. त्यावेळी आरोपीने किचनचा दरवाजा वाजवून जेवण करायचे आहे सांगितले. Pune Crime
मुलीने कपडे बदलल्यानंतर दरवाजाची कडी काढून दरवाजा उघडला. त्यावेळी आरोपीने किचनमध्ये येऊन पीडित मुलीला शिवीगाळ करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
घाबरलेल्या मुलीने आरडा ओरडा केला असता तिची आई व शेजारी घरात आले. आरोपीने मुलीला व तिच्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागवडे करीत आहेत.