Pune Crime : चिकन विक्रेत्याची दहशद, रस्त्यावर जाताना अनेकांवर केले सुऱ्याने वार, पोलीसही जखमी, घटनेने पुणे हादरलं…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका चिकन विक्रेत्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक सुरा घेऊन हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन पोलिसांसह काहीजण जखमी झाले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

राहुल सैफुद्दीन शेख, असे हल्ला करणाऱ्या चिकन विक्रेत्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर सिंहगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुण्यातील नऱ्हे परिसरात मंगळवारी (ता.२३) दुपारच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ,राहुल याचे नऱ्हे गावात चिकन विक्रीचे दुकान आहे. सोमवारी आरोपी दुकानात बसून सुरा फिरवत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. यामुळे मंगळवारी आरोपीची हिंमत आणखीच वाढली. Pune Crime

त्याने थेट रस्त्यावर उतरून नागरिकांवर सुऱ्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली. स्थानिकांनी या घटनेची माहिती सिंहगड पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी आरोपीने दोन पोलिसांवर देखील सुऱ्याने हल्ला चढवला. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर इजा झाली नाही. मात्र, दोन पोलिसांसह काही नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!