Pune Crime : पुणे हादरले! लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून रिक्षात ठेवला मृतदेह, प्रियकर फरार..
Pune Crime : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची घरात हत्या करून, तिचा मृतदेह रिक्षात ठेवून प्रियकर गायब झाल्याचा धक्कादायक पुण्यातून समोर आली आहे. ही घटना काल रात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान घडली असून, सकाळी ती उघडकीस आली आहे.
शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, विवाहानंतर शिवानीचे पती सोबत खटके उडाले होते, त्यानंतर रिक्षाचालक विनायक आवळे सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. गेली दोन वर्षे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये किरकोळ वाद झाले.
याच रागातून विनायकने शिवानीचा गळा आळवून हत्या केली. मग, मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली आणि तो पसार झाला. काहींना आज सकाळी रिक्षात शिवानी बसल्याचं दिसलं, पुढं ती मृत पावल्याचं लक्षात आलं. Pune Crime
वाकड पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला आहे. ही हत्या प्रियकर विनायकने केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचलेली आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.