Pune Crime : पुण्यात भयंकर घटना!! चाकूचा धाक दाखवून कॅब पळवली अन् तिघांना…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. शहरातील दोघा सराईतांनी कॅब चालकाला चाकूचा धाक दाखवत कॅब पळवली. नंतर भरधाव असलेल्या कॅबने रस्त्यात एका पादचाऱ्यासह तब्बल तीन वाहनांना उडविल्याची घटना रविवारी दुपारी अंडी उबवणी केंद्रानजीक घडली आहे.

याप्रकरणी दोघाही सराईतांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय भाऊसाहेब कोळे (वय. १९, रा. पिरंगुट) यानी दिलेल्या तक्रारीनुसार मुस्तफा शफीक कुरेशी ऊर्फ मुस्सा (वय. २०, रा. महंमदवाडी) आणि सिद्धांत चव्हाण (वय. २०, रा. बोपोडी) या दोघांना अटक केली आहे. Pune Crime 

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय हा कॅबमध्ये एक पॅसेंजर घेऊन चालला होता. त्याची गाडी अंडी उबवणी केंद्राजवळ दोघांनी रस्त्याच्या मध्येच अडवली. त्यांनी अक्षय आणि पॅसेंजरला चाकूचा धाक दाखवून खाली उतरवले. नंतर दोघे गाडीत बसून भरधाव वेगाने चालले. त्यांनी प्रथम एका पादचाऱ्यास उडवले. नंतर दोन रिक्षांना उडवले. तेथून संचेती पुलावर ते सिग्नलपाशी आले असता, एका कारला जोरदार धडक दिली.

यामुळे त्यांची कार थांबली. नागरिकांनीआरडाओरडा करून मुस्साला ताब्यात घेऊन पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी मुस्साला पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याने गाडी चोरल्याचे सांगितले. त्याचा साथीदार सिद्धांतचा शोध घेतला. तेव्हा तो घरी सापडला. दोघांवरही खडकी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दोघेही सराईत गुन्हेगार असून, दोघांवरही हाणामारीचे गुन्हा दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!