Pune Crime : पुणे हादरले! पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणीचे अपहरण करून बलात्कार, घटनेने उडाली खळबळ…

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने कारमधू पळवून नेले. तिच्यासोबत लग्न करुन शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
हा प्रकार गुरुवारी (ता.१५) सकाळी साडे आठ ते शुक्रवारी (ता.१६) सकाळी साडेआठ या दरम्यान खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप व दस्तुरवाडी गावच्या हद्दीत घडला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. Pune Crime

याप्रकणी वाघोली येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी ता. हवेली, जि. पुणे), अमोल जाधव (रा. लोणीकंद ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून महेंद्र वेताळ याला शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास अटक केली आहे. हा गुन्हा लोणीकंद पोलिसांकडून चंदननगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणी गुरुवारी सकाळी खराडी येथील झेन्सार चौकातील बस स्टॉप येथे जात होती. त्यावेळी अचानक एक चारचाकी पांढरी कार तिच्याजवळ येऊन थांबली. आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवला.
तिचे अपहरण करुन आरोपी महेंद्र वेताळ याने तिच्यासोबत जबरदस्तीने लग्न करुन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यानंतर नाशिक रोडने दस्तुरवाडी गावच्या हद्दीतील एका डोंगरावर नेऊन तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान, तिला जातीवाचक शिवीगाळ करुन तिला तुळापुर फाटा येथे आणून सोडून देऊन आरोपी पळून गेले. यानंतर तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.
