Pune Crime : कॉलेजमधून तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार, तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
Pune Crime पुणे : मैत्री असलेल्या तरुणीचे जबरदस्तीने अपहरण करुन तिला पनवेल, बाणेर येथे नऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पनवेल व बाणेर येथे ५ ते ७ सप्टेबर दरम्यान घडली आहे. (Pune Crime)
याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तबरेज शेख (वय १९, रा. शिवाजी मार्केटजवळ, कॅम्प) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकत असून त्यांच्यात मैत्री आहे. आरोपीने फिर्यादीला काहीही न सांगता त्याचेबरोबर गाडीवर बसवून पुणे स्टेशन (Pune Station) येथे घेऊन गेला. तेथून पनवले येथे नेले. तेथे लॉजवर तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यानंतर तिला बाणेर येथील लॉजवर आणून तेथेही तिच्याशी शारीरीक संबंध केले. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तबरेज शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक बनसुडे तपास करीत आहेत.