Pune Crime : फक्त साहेबांना खुश करा अन् बसून पगार घ्या!! पुणे महापालिका अधिकाऱ्यांकडून महिलेसोबत धक्कादायक कृत्य, घटनेने पुणे हादरलं…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या हाताखील काम करणाऱ्या एका महिलेसोबत अश्लील बोलून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पालिकेच्या मुकादम व सॅनिटरी इन्स्पेक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ एप्रिल २०२४ ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत घडली. या प्रकारामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

याप्रकणी एका ३५ वर्षीय महिलेने मंगळवारी (ता.७) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मुकादम रोहिदास फुंदे (वय. ५० रा. चव्हाणनगर, पुणे), सॅनिटरी इन्स्पेक्टर दिनेश सोनावणे (वय.४०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर घडला आहे. Pune Crime 

सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगार असून स्वच्छता कर्मचारी आहेत. त्या पद्मावती येथील एका आरोग्य कोठीवर नेमणुकीस आहेत. तर फुंदे ठेकेदार तर विभागाचा आरोग्य निरीक्षक म्हणून सोनावणे याच्याकडे जबाबदारी आहे. पीडित महिलेने काही कारणास्तव बदली कामगार लावलेला होता.

मुकादम फुंदे याने याबाबत आक्षेप घेतला. फिर्यादी यांना एकटे गाठून त्यांना ‘तुम्ही तुमचे सफाईचे काम करण्यासाठी हाताखाली माणूस लावलाय. त्याला कशाला पैसे देताय? त्याच्या बदल्यात हॉटेलवर चल, साहेबांना खुश कर आणि बसून पगार घ्या’ असे म्हणून शारीरिक संबंधाची मागणी केली.

तसेच आरोपीने फिर्य़ादी यांना अश्लील स्पर्श करुन सातत्याने अश्लील शेरेबाजी व संभाषण करुन फोनवरुन शारीरिक संबंधाची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!