Pune Crime : घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन, पुण्यात धक्कादायक घटना, एका तरुणाला अटक…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून असभ्य वर्तन करुन तिला धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (ता.२८) खडकी येथील मुळा रोडवर घडला दुपारी एकच्या सुमारास घडला आहे.

याप्रकणी १६ वर्षाच्या पिडीत तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, उदयराज अभंग उर्फ लड्डु (वय.१९ रा. मुळा रोड, खडकी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलगी राहत असलेल्या घराच्या पाठीमागील खिडकीवर थाप मारली. त्यामुळे मुलगी खिडकीत कोण आहे हे पाहण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी दरवाजातून घरात आला. आरोपीने घरात आल्यानंतर मुलीचा हात पकडला. तसेच आरडा ओरडा केला तर लक्षात ठेव असे म्हणून दम दिला. Pune Crime

घाबरलेल्या मुलीने मदतीसाठी आई आणि भावाला आवाज दिला. मुलीचा आवाज ऐकून दोघे बाहेर आले असता आरोपीने पाठीमागील खिडकीतून उडी मारुन पळून गेला.

याबाबत पिडीत तरुणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!