Pune Crime : सरकारी कार्यालयात महिलेला अश्लील शिवीगाळ, पुण्यातील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार गुरुवारी (ता.२७) दुपारी तीनच्या सुमारास अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत पुणे येथे घडला आहे. याप्रकणी ४२ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्रु नामदेव खवळे (रा.डॉ. राममनोहर लोहीया नगर, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

सविस्तर माहिती अशी , फिर्यादी शासकीय कार्यालयात काम करतात. गुरुवारी दुपारी फिर्यादी कार्यालयात काम करत असताना आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मोठमोठ्याने बोलून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

तसेच फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात तुला आता सरळ करतो असी धमकी दिली. तसेच अश्लील शिवीगाळ करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!