Pune Crime : ‘तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ म्हणत तरुणीचा विनयभंग, हडपसर येथील धक्कादायक घटना..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
‘तू मला खुप आवडतेस, तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ असे बोलून सोबत काम करणाऱ्या तरुणीसोबत असभ्य वर्तन करुन तिचा विनयभंग केला . याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ५२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी ते २५ जून या कालावधीत घडला आहे.
याबाबत २५ वर्षाच्या पीडित मुलीने मंगळवारी (ता.२५) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल सुदाम माने (वय.५२ रा. शेवाळवाडी मांजरी, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी हडपसर परिसरात एका ऑफिसमध्ये काम करतात. अनिल माने याने तरुणीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन ‘तू मला खुप आवडतेस, तुझ्या बद्दल माझ्या मनात फिलिंग्स आहेत’ असे बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. Pune Crime
दरम्यान, त्यानंतर तिला वारंवार फोन करण्यास सुरुवात केली. तरुणीने अनिल माने याला फोन करु नको असे सांगितले. मात्र, त्याने वारंवार फोन केले. तसेच तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करुन विनयभंग केला. आरोपीने पाठलाग करुन त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.