Pune Crime : तरुणीकडे पाहून भररस्त्यात करत होता अश्लील हावभाव, हडपसर पोलिसांनी दाखवला हिसका, आरोपीला अटक…
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अल्पयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते शनिवार (ता.१६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हडपसर परिसरातील वैदवाडी येथे घडला आहे.
याप्रकरणी अविनाश शंकर आलकुंटे (वय. ३५), सुनिल शंकर आलकुंटे (वय.४० दोघे रा. शंकरमठ, आलकुंटे वस्ती, वैदवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अविनाश आलकुंटे याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी पीडित तरुणीचा डिसेंबर २०२३ पासून वारंवार पाठलाग केला. शनिवारी सायंकाळी मुलगी तिच्या घरी जात असताना आरोपी अविनाश याने मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करुन घाणेरडे आवाज काढले. Pune Crime
तसेच तिला काडीने टोचून तिच्यासोबत जवळीस साधण्याचा प्रयत्न केला. मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासोबत अश्लील बोलून विनयभंग केला. तसेच तिला धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.