Pune Crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून केला अन् रात्रभर पत्नीसोबत…; भयंकर घटनेने पुणे हादरलं

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याचा संशय घेत आपल्या पत्नीचा खून करून त्याच खोलीत पती झोपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री दारू पिऊन पत्नीशी वाद घातला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह असलेल्या रूममध्येच आरोपी झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ही घटना समोर आली आहे.
लक्ष्मीबाई बाबा जाधव (वय ४५, रा. बुर्केगाव ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, पती बाबा जाधव (वय ५४ वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय बुर्केगावात राहत होते. पती पत्नीवर चारित्र्याच्या संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होता. सोमवारी रात्री दोघांचा पुन्हा वाद झाला.मध्यरात्री आरोपी बाबा जाधवने लक्ष्मीबाई यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात असताना बाबाही झोपला.
दरम्यान त्यांची मुलगी निकिता पवार आईला फोन करत होती. मात्र आई फोन उचलत नाही. ती कामावर देखील न आल्याने ती घरी गेली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. Pune Crime
या प्रकरणात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, चारित्र्यांचा संशय घेत पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिचा खून . संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. त्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.