Pune Crime : धक्कादायक! हडपसर येथे हुंड्यासाठी पत्नीचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला बेड्या..


Pune Crime पुणे : हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता.२५) रोजी गंगानगर हडपसर याठिकाणी घडली आहे

याप्रकरणी पतीला अटक करून तीन जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

सुहास हिंगणे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर सासु शारदा हिंगणे, सासरे रोहिदास हिंगणे, नणंद अनुराधा जाधव, अमोल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोमल सहास हिंगणे (वय. २२) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोपट देविदास खंदारे (वय.४७ रा. आष्टा ता. आष्टा, जि. बीड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, अटक आरोपी पती सुहास हिंगणे व फिर्यादी यांची मुलगी कोमल यांचा विवाह मे २०२२ मध्ये झाला आहे. लग्नानंतर आरोपी कोमल हिला घरगुती कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास देत होते.

तसेच हुंड्याची मांगणी करुन तिला शिवीगाळ करन मारहाण करत होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून कोमल हिने (ता.२५) रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!