Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा उद्रेक! भररस्त्यात तरुणीची छेडछाड, मदतीला आलेल्या तरुणांना लाकडी दांडक्याने मारहाण..


Pune Crime : पुणे शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पायी घरी जाणाऱ्या तरुणीला भर रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. तसेच यावेळी तरुणीच्या मदतीला आलेल्या तरुणांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील खराडी परिसरात हा प्रकार घडला आहे. काल रात्री एकच्या सुमारास ही घडना घडली आहे. या घटनेत फिर्यादी यांचे मित्र रुपेश हुंडारे आणि सिद्धांत सिंग जखमी झाले आहेत.

याप्रकरणी खराडी परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्या फिर्याद दिली आहे.सागर पाटील व सौरभ कोंडके व इतर दोन अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime

तरुणी रात्र एक वाजता खराडी परिसरातून कामावरुन घरी परतत होती. त्याचवेळी या परिसरातील काही तरुण रस्त्याच्या कडेला शेकोटी करत बसले होते. ज्यावेळी तरुणी एकटी जाताना दिसली त्यावेळी या तरुणांनी तरुणी जवळ जाऊन बोलाायचं आहे, असं सांगितलं.

हे पाहून तरुणीने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर या तरुणांनी काही वेळ तरुणीचा पाठलाग केला आणि तिच्या बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणी घाबरली आणि तरुणीने तिच्या मित्रांना कॉल केला.

त्यावेळी मित्राने या तरुणांकडे जाब विचारला असता या तरुणांनी तरुणीच्य दोन मित्रांना लाकडाच्या दांडक्याने मारहाण केली. तसेच एका मित्राच्या मानेवर तर दुसऱ्या मित्राच्या हातावर खांद्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!