Pune Crime : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार करणारे नराधम सीसीटीव्हीमध्ये कैद, व्हिडिओ आला समोर…
Pune Crime : बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर गँगरेप प्रकरणात तीस तासांनंतरही आरोपींचा तपास लागलेला नाही. तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २५ पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.
दरम्यान, एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये तिघे जण दिसत असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. घटनेनंतर १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे.
याबाबत मिळालेली माहिती असी की, गँगरेप प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक डाटाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. जिथं घटना घडली तिथं मोबाइलला रेंज नाही. याशिवाय दहा किमी अंतराच्या परिसरात सीसीटीव्हीसुद्धा नसल्यानं तपासात अडथळा येत आहे. Pune Crime
दरम्यान, बोपदेव घाटात सासवडच्या बाजूला तीन संशयिताचं एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्यानंतर साधारण १५ मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असावेत असा संशय पोलिसांना आहे.