Pune Crime : फेसबुकवरील मैत्री पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, मुंढवा येथील तरुणावर गुन्हा..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
फेसबुकद्वारे मैत्री करून मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१६ ते २८ जानेवारी या कालावधीत वानवडी, लोणावळा, वडकी, हडपसर, कोरेगाव पार्क येथे घडला आहे.
याप्रकणी घोरपडी गाव येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीने मंगळवारी (ता.६) मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन चेतन चंदर मुट्टल (वय. २२ रा. मुत्तलवाडी, पाटण, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सातारा येथील चेतन मुट्टल याने पुण्यातील घोरपडी गावात राहणाऱ्या 20 वर्षीय मुलीसोबत 2016 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. Pune Crime
यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिनवडे करीत आहेत.