Pune Crime : पुण्यात चाललंय काय? सलग चौथ्या दिवशी गोळीबार, जुन्या वादाचा राग मनात धरून झाडल्या थेट तीन गोळ्या, घटनेने पुणे हादरले…


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हंटले तरी हरकत नाही. त्यात गोळीबाराच्या घटनादेखील वाढत आहे. सलग चौथ्या दिवशी झालेल्या गोळीबाराने पुणे हादरले आहे.

जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर गोळीबार झाल्यानंतर आता येरवडा परिसरात पहाटेच्या वेळी गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात आज पहाटे पुन्हा दोघांवर करण्यात गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यातील येरवडा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. आकाश चंदाले याने विकी चंदाले या दोघांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Pune Crime

पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान येरवडा येथील अग्रेसन स्कूल समोर हा प्रकार घडला आहे. दोघांमध्येही जुना वाद होता. त्यातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याचंदेखील पोलीस तपासात समोर आले आहे.

सलग चौथ्या दिवशी पुण्यात गोळीबार…

पुण्यात जंगली महाराज रोड आणि हडपसरमध्ये शेवाळवाडी परिसरात गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या.बांधकाम व्यवसायिकावर फायरिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.धीरज दिनेशचंद्र आरगडे बांधकाम व्यवसायिकावर स्विगीचे वस्त्र परिधान करून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला.

हल्लेखोर स्विगीसारखे वस्त्र परिधान करून हेल्मेट घातले होते. त्या दोघांनी पिस्टल काढून दोन वेळा फार करण्याचा प्रयत्न केला मात्र फायर न झाल्याने दोन आरोपींनी पुढे पळ काढला होता. शेवाळवाडीत दोन सैनिकांमध्ये वाद झाल्याने भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला होता. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!