Pune Crime : धक्कादायक! प्रेम करून लग्न केलं अन् तरुणीचा घरातच आढळला मृतदेह, पुण्यात घडली भयंकर घटना, नेमकं काय झालं?


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर इथून समोर आली आहे. इथं सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह झालेल्या विवाहितेचा मृतदेह फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. Pune Crime

साक्षी अक्षय गाडे ( वय २०) असे मृत विवाहितेचे नाव असून २० नोव्हेंबर रोजी हा प्रकार मंचर परिसरातील माळवाडी इथल्या संकल्प रेसिडेन्सी इथे घडला होता. याप्रकणी साक्षीची आई अरुणा संजय गांजाळे (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या आत्महत्येस पतीच कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची साक्षी आणि अक्षय यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी न्यायालयात जाऊन लग्न केले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचे हिंदू रिती रिवाजाप्रमाणे गणराज मंगल कार्यालय मंचर येथे दि.१२ जून २०२३ रोजी लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली. अक्षयने ‘कॅफेमध्ये साहित्य खरेदीसाठी केलेली पैशाची मागणी पूर्ण केली.

त्यानंतर “कर्ज झाले आहे असे सांगून दोन लाख रूपयांची मागणी अक्षयने केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर “मी साक्षीला सांभाळणार नाही, तिला मारून टाकीन. मला कोणीही काही करू शकत नाही. मी यापूर्वी ५० हजार रुपये खर्च करून दुसऱ्या मुलीचा मॅटर सॉव्ह केला आहे. त्यामुळे हा मॅटर सुध्दा मी सॉल्व करू शकतो.” अशी धमकी त्याने दिली.

त्याचे दुसरीकडे अनैतीक संबंध होते. हे साक्षीच्या निदर्शनास आले. तेव्हा साक्षीने विरोध करायाला सुरुवात केली. अक्षय हा दारू पिऊन येऊन साक्षीला मारहाण करत होता. तसेच त्याने साक्षीला भररस्त्यावर देखील मारहान केली होती.

हा सर्व प्रकार साक्षीने मला सांगितला होता, असे फिर्यादीत आईने नमूद केले आहे. ‘माझ्या मुलीच्या मृत्यूस तिचा नवरा अक्षय हाच कारणीभूत असल्याचे’ फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!