Pune Crime : वडिलांनी कर्जाची परतफेड न केल्याने मुलीला लॉजमध्ये ठेवून बलात्कार, देहविक्रीही करायला लावली, गुन्हा दाखल…


Pune Crime : पुणे शहर अत्याचाराच्या एका घटनेमुळे हादरले आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला १५ दिवस डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तसेच तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने बुधवारी (ता.१४) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पुनम आकाश माने (वय.२२) हिला अटक केली आहे. तर आकाश सुरेश माने (वय.२४ रा.शंकराच्या मंदिराजवळ, कात्रज गावठाण, कात्रज, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी पीडित मुलीच्या वडिलांनी आजारपणासाठी आरोपींकडून ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, त्यांना पैसे परत करात आले नाहीत. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी मुलीला जबरदस्तीने पळून नेत तिला के.के.मार्केट येथील एका लॉजमध्ये १० ते १५ दिवस डांबून ठेवले. Pune Crime

त्याठिकाणी आरोपी आकाश माने याने दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठुनही वसुल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी केली. तसेच ग्राहकांकडून पैसे घेऊन तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!