Pune Crime : भयंकर! पुण्यात मध्यरात्री थरारक घटना, १ वाजता दरवाजा ठोठावला अन्…; घटनेने शहर हादरले

Pune Crime : शिक्षणाचे माहेरघर म्हणल्या जाणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस फारच विचित्र घटना घडत आहेत. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. कधी रस्त्यावर गोळीबार, अपघातांचे वाढते प्रमाण तर कधी भरदिवसा केलेली हत्या यामुळे पुण्यात सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशात पुण्यातील कर्वेनगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबधाना अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराकडून खून करवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करवून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला. व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भोसकून खून करण्यात आला आहे.
अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय. ४२) असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कर्वेनगर येथे उच्चभ्रू श्रीमान सोसायटीमधील अमोल निवगुंने या इसमाचा रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून टोकदार हत्याराने पोटात वार करुन खून करण्यात आला आहे. वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या दरम्यान त्याचा दरवाजा अज्ञात इसमांनी वाजवला.
कोणी आले असल्याचा अंदाजाने अमोल याने दरवाजा उघडला असता आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. दरम्यान अमोल यांनी आरडाओरडा केल्या नंतर घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या होत्या. पण, आरोपी तोपर्यंत घरातील दागिने आणि रोख रक्कम, किंमती वस्तु घेऊन करुन पसार झाले. Pune Crime
दरम्यान, मृत अमोल निवगुंने हे एका खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करत असून त्यांना तीन मुली आहेत, या घटनेच्या दिवशी आरोपींने तोंडावर बुरखा घातला असल्याने मुलींनी आरोपीला पाहुणही ओळखता आले नाही.
आपल्या डोळ्यासमोरच वडिलांचा खून झाल्याने मुलींच्या मनावर मोठा आघात झाला आहे. त्या बोलण्याचा मनस्थितीत नव्हत्या. मात्र तपासात अमोल निवंगुणे यांच्या पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचं समोर आलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.