Pune Crime : पुणे पुन्हा हादरले! दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती, प्रेम प्रकरणातून प्रेयसीची गोळ्या घालून हत्या..


Pune Crime पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

पुणे शहरात एमपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिची हत्या काही महिन्यांपूर्वीच झाली होती. त्यानंतर पुन्हा पुणे शहरात त्याच कारणामुळे खून झाला आहे. प्रेयसी सोडून जाईल, लग्न करणार नाही, यामुळे आयटी अभियंता तरुणीची हत्या करण्यात आली आहे.

शहरातील एका मोठ्या आयटी कंपनीत वंदना द्विवेदी तरुणी अभियंता म्हणून कार्यरत होती. तिची तिच्या गावातील म्हणजे लखनऊमधील युवक ऋषभ निगम याच्याशी ओळख होती. दोघांचे काही वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते.पण मागील काही दिवसांमध्ये वंदना आणि ऋषभ यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

वंदनाच्या प्रियकराला तिच्याशी लग्न करायचे होते. वंदना सॉफ्टवेअर इंजीनियअर होती आणि ऋषभ ब्रोकर होता. वंदना आपल्याला सोडून जाईल, असे त्याला सतत वाटत होते. त्यामुळे त्याने लॉजमध्ये आपल्या प्रेयसीवर पाच गोळ्या झाडत तिची हत्या करून तो पसार झाला. त्याचा तपास सुरु असताना त्याला मुंबईमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Pune Crime

दरम्यान, वंदनाचा मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडाली. तिची हत्या करणाऱ्या प्रियकराला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले. तसेच ऋषभ याला वंदनाचे इतर प्रेम संबंध असल्याचा संशय ही होता.

त्यामुळे ऋषभ याने वंदना हिला हिंजवडी मधल्या एका लॉजवर बोलवले आणि २७ तारखेला रात्री तिची पाच गोळ्या घालून हत्या केली. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण राज्य हादरले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!