Pune Crime : बारामतीच्या दोघांना यवतमध्ये पकडले, अन् यवतसह भिगवण पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..


Pune Crime  पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज विशेष कारवाई करून दोन जणांना अटक केली आहे. त्यांना अटक केल्यानंतर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेला मोबाईल त्यांच्याकडे आढळून आला. तसेच यवतसह भिगवणच्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती आहे. Pune Crime

निलेश गणेश गोरे (वय. २२ वर्षे, रा. खंडोबानगर बारामती) व आकाश दत्ता सोनवणे (वय. २२ वर्षे राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावी आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेला एक मोबाईल याच हद्दीत कोणीतरी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने व यवत पोलिसांनी स्थानिक कारवाई केली संयुक्त कारवाई केली.

तसेच मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेला मोबाईल निलेश गोरे याचेकडे असून तो त्याचे साथीदारासह वरवंड येथील पूला जवळ येणार असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना याची माहिती कळवण्यात आली आणि यवत पोलिसांनीही वरवंडच्या पुलाजवळ सापळा रचला.

मिळालेल्या माहितीनुसार दोघेजण दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी मोटरसायकल चालवणारा निलेश गोरे असल्याची खात्री झाल्याने दोघांना ताब्यात घेऊन त्यानंतर दोघांची झडती घेतली असता निलेश गोरे याच्याकडे MI कंपनीचा मोबाईल मिळून आला.

त्याचा IMEI तपासला असता तो यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला मोबाईलशी मिळता जुळता असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन, अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच त्यांनी भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आणखी एक गुन्हा केल्याची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!