Pune Crime : पुण्यात टोळक्यांचा राडा! शांतता असलेल्या रस्त्यावर १०-१२ जणं आले, तरुणांवर कोयत्याने सपासप वार केले, अन्….

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
कायदे कठोर करूनही गुन्ह्यांचे प्रमाण कमी होत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यात टोळक्यांनी धुमाकूळ घातला आहे. शातच आता पुन्हा एकदा पुण्यात टोळक्यांनी धुमाकूळ घातला आहे.
खडकवासला भागात १० ते १२ जणांच्या टोळक्याने काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने सपासप वार केले आहे. ही घटना गोऱ्हे बुद्रुक गावातील असल्याचं सांगितलं जातंय. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ज्यात १० ते १२ जणांच्या टोळक्याने कोयते-तलवारीने ३ जणांवर हल्ला केल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला भररस्त्यात केला. रस्त्यावर इतर लोकांची ये-जा सुरू असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तरीही या गुंडांना कसलीही भीती नाही. Pune Crime
दरम्यान, या टोळक्याने दुचाकी अडवून गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार करत लोकांना जखमी केलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस याप्रकरणी काय कारवाई करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या प्रकाणामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.