Pune Crime : पुणे हादरले! अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा..


Pune Crime पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. Pune Crime

घरात झोपलेल्या अल्पवयीन पुतणीसोबत काकाने गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच आरोपीने एक वर्षापूर्वी तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सोमवारी (ता. २३) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आहे. त्यानुसार फिर्यादी यांच्या ३२ वर्षाच्या दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (ता. २३) दुपारी चारच्या सुमारास घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी फिर्यादी यांच्या दुकानाशेजारी असलेल्या खोलीत झोपली होती. त्यावेळी आरोपीने मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी पीडित मुलीने आरडा ओरडा केल्याने फिर्यादी या खोलीत आल्या. त्यांनी मुलीला आरोपीच्या तावडीतून सोडवले. मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपी तेथून निघून गेला.

त्यानंतर फिर्यादी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दिली. दरम्यान, आरोपीने जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये फिर्यादी यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!