Pune Crime Court News : पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी २ महिलांची निर्दोष मुक्तता, पुण्यात पोलीस ठाण्यात घडली होती घटना…


Pune Crime Court News : पोलिस ठाण्यात पोलीसांनाच धमकी दिल्या प्रकरणी २ महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी महिला सुगरा अबुकार मेमन (वय. ३५), कोकीळा संतोष मकवाना (वय. ३७, दोघी रा.एम.जी. रोड, पुणे) यांची लष्कर पोलिस ठाण्यात जाऊन महिला पोलिस अधिकारी मनीषा किसन वलसे यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे.

नेमकं घडलं काय?

दिनांक २५/०२/२०२३ रोजी आरोपी असलेल्या दोन्ही महिला एम.जी.रोड वरिल त्यांच्या तयार कपडे विकण्याच्या व्यवसायातून आप-आपसात वाद होते. त्या दोन्ही महिला आपापसांत एकमेकींच्या विरोधात तक्रार देण्यासाठी लष्कर पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. फौजदार मनीषा वलसे या तक्रार लवकर घेत नाहीत म्हणून दोन्ही महिला आरोपींनी लष्कर पोलिस ठाण्यात नेमणूकीस व कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस फौजदार श्रीमती मनीषा वलसे यांनाच धमकी दिली.

मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करत, तु फक्त बाहेर ये मग तुला दाखवते, आमची पोच वरपर्यंत आहे. असे म्हणत फौजदार वलसे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्याद लष्कर पोलिस ठाण्याच्या फौजदार मनीषा वलसे यांनी आरोपींच्या विरोधात दिनांक २५/०२/२०२३ रोजी लष्कर पोलीस ठाण्यातच दिली होती. Pune Crime Court News

या खटल्यात सरकार पक्षाने ४ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी घटनाक्रम आहे तसा न्यायालयात सांगितला. आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी युक्तिवाद केला. लष्कर पोलिस ठाण्यातील घटनास्थळी उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फूटेज लष्कर पोलीसांनी जाणीव पूर्वक न्यायालयात दाखल केलेले नाहीत.

पोलिस सोडून तटस्थ एकही साक्षीदार न्यायालयात हजर करण्यात सरकारपक्ष अपयशी ठरला आहे. दोन्ही महिला आपा-पसांतील भांडणाची तक्रार देण्यासाठी लष्कर पोलिस ठाण्यात गेल्या होत्या.

दोन्ही आरोपींना लष्कर पोलीसांकडुन न्याय मिळेल हि अपेक्षा होती. उलट फिर्यादी असलेल्या महिला पोलिस फौजदार मनीषा वलसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला आरोपींना पोलिस ठाण्यातच विनाकारण बेदम मारहाण केली.

पोलीसांनी विनाकारण केलेल्या मारहाणीची तक्रार महिला आरोपींनी त्याच वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर यांच्या समोर केली होती. दोन्ही महिला आरोपींनी मारहाण केल्याची तक्रार पुढे वाढवू नये, दोन्ही आरोपींवर दबाव टाकण्यासाठी दोघींच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांनाच धमक्या, शिवीगाळ, धक्काबुक्की करण्याचं धाडस कोणी करू शकणार नाही.

दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ, धक्काबुक्की, सरकारी कामात अडथळा निर्माण केला हे आरोप सरकारपक्ष सिध्द करू शकलेला नाही. असा युक्तिवाद ॲड. मिलिंद पवार व ॲड. राकेश सोनार यांनी केला तो ग्राह्य धरून दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.ॲड. राकेश होगाडे व हर्षवर्धन मिलींद पवार यांनी या खटल्यात मदत केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!