Pune Crime : वर्क फ्रॉम होमच्या बहाण्याने पुण्यातील शिवणे परिसरातील व्यक्तीची लाखोंची फसवणूक, गुन्हा दाखल…


Pune Crime  पुणे : पुण्यात फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली असून , सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. फ्रॉम होम जॉब देण्याच्या बहाण्याने एका ४४ वर्षाच्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील शिवणे परिसरात घडला आहे. आरोपींनी वेगवेगळे टास्क देण्याच्या बहाण्याने या व्यक्तीची ५ लाखांची फसवणूक केली. Pune Crime

याप्रकरणी भास्कर बळाराम शिंदे (वय. ४४ रा. देशमुखवाडी, शिवणे, पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा ३० जून २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला आहे. Pune Crime

पोलिसांनी टेलीग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिंदे यांनी याबाबत पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी उत्तमनगर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी टेलिग्रामच्या माध्यमातून भास्कर शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना वर्क फ्रॉम होम राहून पैसे कमता येतील असे सांगितले. आरोपींनी शिंदे यांना बार्टलेबी प्रा. लि. या कंपनीसाठी जाहिरात करण्यासाठी टास्क देऊन तो पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवले. पहिल्या दोन टास्कचे पैसे फिर्यादी यांच्या बँक खात्य जमा करुन त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर शिंदे यांना वेगवेगळी कारणे सांगून ४ लाख ९५ हजार २८० रुपये येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पैसे जमा केले.

दरम्यान, पैसे जमा केल्यानंतर शिंदे यांना कोणताही टास्क न देता सायबर गुन्हेगारांनी पैशांचा अपहार करुन फसवणूक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!