Pune Crime : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन शरीर संबंधाची मागणी, हडपसर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..

Pune Crime : अल्पवयीन १३ वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करुन मानसिक त्रास देऊन. मुलगी क्लासवरुन घरी येत असताना भररस्त्यात तिला अडवून तिच्यासोबत अश्लील बोलून तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी करुन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार २९ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील वेताळ मंदिराच्या समोर घडला आहे.
याप्रकणी पीडित मुलीच्या ४१ वर्षीय आईने बुधवारी (ता.७ ) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धिरज नितीन शिंपी (वय. २१ रा. रेल्वे गेट, मांजरी बुद्रुक, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी मांजरी येथील एका शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिकते. आरोपी मागील सहा महिन्यापासून मुलीचा पाठलाग करत आहे. २९ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी क्लासवरुन घरी जात होती.
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आरोपीने तिचापाठलाग केला. वेताळ वस्ती येथील वेताळ मंदिरासमोर गाडी आडवी लावून मुलीला आडवले. तिचा हात पकडून अश्लील बोलून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.