Pune Crime : वाद मिटवण्यासाठी बोलवले अन् थेट तरुणीला मारहाण केली, ३ मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पुण्यातील घटना…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी बोलवून घेऊन तरुणीला अश्लील शिवीगाळ करुन धमकी देऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

हा प्रकार ११ मार्च व २२ मे रोजी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय इमारतीच्या पार्किंग मध्ये व वडारवाडी येथील दीप बंगला चौकात घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकणी ३२ वर्षीय तरुणीने बुधवारी (ता.१९) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रतिक बाळकृष्ण काकडे (वय. ३०), प्रज्योत बाळकृष्ण काकडे (वय.३२ रा. बालाजी अपार्टमेंट, नवी सांगवी), आश्वीन पवार (वय-29 रा. वसई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्य़ादी सेनापती बापट रोडवरील एका शासकीय कार्यालयात काम करतात. आरोपी प्रतीक आणि फिर्यादी एकमेकांचे मित्र असून त्यांच्यात वाद झाले होते. Pune Crime

मैत्रित झालेला वाद मिटवण्यासाठी आरोपी प्रतिक याने फिर्यादी यांना फिर्यादी काम करत असलेल्या कार्यालयाच्या पार्कींगमध्ये बोलवून घेतले. फिर्यादी तिथे गेल्या असता आरोपी प्रज्योत त्याठिकाणी होता. त्याने फिर्यादी यांना अश्लिल शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्य़ादी त्यांच्या दुसऱ्या ऑफिसकडे निघाल्या.

आरोपींनी त्यांचा पाठलाग करुन दिप बंगला चौकात अडवून शिवीगाळ करून धमकी दिली. यानंतर फिर्य़ादी यांना पुन्हा वाद मिटवण्यासाठी प्रतिक याने बोलवून घेतले. त्यावेळी आरोपींनी अश्लील बोलून शिवीगाळ केली.

तर प्रज्योत आणि आश्वीन यांनी फिर्य़ादी यांच्यासोबत गैरवर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group