Pune Crime : पुण्यात भयंकर घटना! भेटायला ये नाहीतर जीव देईन म्हणत तरुणीला भेटायला बोलवलं अन् कारमध्येच…


Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

तरुणीला भेटण्यासाठी बोलवले आणि तिच्यावर स्वत:च्या कारमध्येच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

गौरव पांडूरंग बोराटे (वय.२७) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघेही एकमेकांना चांगल्याने ओखळत होते. दोघांमध्ये मैत्री होती. यातून मुलाने मुलीला भेटण्यासाठी बोलवलं होतं. जर भेटायला आली नाहीस तर जीव देईल, अशी धमकी त्याने मुलीला दिली आणि भेटायला बोलवले.

त्यानंतर तिला कारमध्ये बसायला सांगितले आणि कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीेने तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. Pune Crime

आरोपी वारंवार धमकी देत असल्याने फिर्य़ादी यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले. याचा राग आल्याने आरोपी गुरुवारी रात्री अकरा वाजता पीडित तरुणी राहत असलेल्या सोसायटीत गेला.

त्याने तरुणीच्या वडीलांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार जून २०२१ ते सप्टेंबर २०२३ आणि गुरुवारी (ता.८) रात्री अकराच्या सुमारास वाघोली येथे घडला आहे. या सगळ्या प्रकरणी तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!