Pune Crime : पुण्यात बिल्डरची आत्महत्या, बंदूक काढली अन्….! घटनेने नऱ्हेत खळबळ
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुण बांधकाम व्यावसायिकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नऱ्हे परिसरात सोमवारी उघडकीस आला.
रिअल इस्टेट एजंटने स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. याघटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी उशिरा उघडकीस आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मयूर सुनील नरे (वय.३१ रा. जांभूळवाडी, आंबेगाव, पुणे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील सेवा रस्त्यालगत असलेल्या सिद्धिवीनायक अंगण सोसायटी येथे काव्या ग्रुप म्हणून मयूर नरे यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. ते बांधकाम प्रकल्पाची कामे करत होते. तसेच इस्टेट एजंट म्हणूनही काम करत होते. Pune Crime
मयूर शनिवारी रात्री कार्यालयात गेले, रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या भावाने रात्री उशिरा त्यांच्या कार्यालयात जाऊन पाहिले. त्यावेळी मयूर यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मयूर यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी मयूर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट मिळाली आहे. यामध्ये अनेकांचे देणे-घेणे त्यांनी लिहून ठेवले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.