Pune Crime : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोघांना भर दिवसा बेदम मारहाण, मांजरी येथील धक्कादायक घटना..
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तिघांनी दोघा तरुणांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत त्यांच्या मनगटाचे हाड व पायाच्या घोट्याचे हाड फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी सनी अशोक ढेकणे (वय ३४, रा. मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत राखपसरे, रोहन पाथरकर, आदित्य राखपसरे याचा मित्र अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
हा प्रकार मांजरीतील वसंतदादा शुगर येथील एच डी एफ सी बँक चार वाडा येथे २२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता घडला.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी व त्यांचा मित्र दादा थोरात हे चारवाडा येथून कॅप्टन वस्तीमार्गे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जात होते. त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी त्यांना अडविले. ते दारु पिलेले होते. तरीही त्यांनी या दोघांकडे आणखी दारु पिण्यासाठी पैसे दे अशी मागणी केली. त्यांना पैसे देण्यास नकार दिला.
त्यामुळे चिडलेल्या अनिकेत याने आपल्या भावाला बोलावून घेतले. त्यांचा भाऊ अदित्य व त्याचा मित्र आला. त्यांनी लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी दोघांना मारहाण केली.
दरम्यान, या मारहाणीत फिर्यादी यांच्या उजव्या हाताचे मनगटाचे हाड व डाव्या पायाचे घोट्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. त्यांनी उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.