Pune Crime : किती ही क्रूरता! संपत्तीसाठी पोटच्या पोराच्या हत्येची सुपारी, गोळीबार घडवला, ऐनवेळी पिस्तुल लॉक झालं अन्…; पुण्यातील घटना


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यात गोळीबारांच्या घटनेतदेखील मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यातच १६ एप्रिलला पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार झाला होता. याच गोळीबार प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावला आहे.

वडिलांनीच मुलाच्या हत्येची ५० लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. संपत्तीच्या वादातून वडिलांनी सुपारी दिल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी वडिलांसह ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

धीरज दिनेशचंद्र आरगडे या बांधकाम व्यवसायिकावर २ जणांनी गोळीबाराचा प्रयत्न केला होता. याघटनेचा सीसीटीव्हीदेखील व्हायरल झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाला मारण्यासाठी एकूण ५० लाखांची सुपारी दिली होती. त्यातले २५ लाख रुपये दिले होते आणि २५ लाख देणे शिल्लक होते. Pune Crime

सविस्तर माहिती अशी की, १६ एप्रिल रोजी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स जवळ दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज दिनेशचंद्र अरगडे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

नेमकं काय घडलं?
अरगडे त्यांच्या कार्यालयात आले. काम संपवून ते दुपारी 3 वाजता घरी जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले. असता त्या वेळी दुचाकीवरून दोघे जण त्याठिकाणी आले. त्यांनी अरगडे यांच्या गाडीजवळ दुचाकी लावली. दुचाकीवरील सहप्रवाशाने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, ऐनवेळी पिस्तूल लॉक झाली आणि त्यामुळे त्यांचा डाव फसला. अरगडे यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांनी केला असता वडिलांनीच संपत्तीच्या वादातून मुलाला जीवे मारण्याचा प्लॅन केला असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी ६ जणांना अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!