Pune Crime : घर नावावर करून देत नसल्याने मुलाकडून आईला बेदम मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
आता नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना देखील उघडकीस येत आहे. सध्या अशीच एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आई घर नावावर करून देत नसल्याने पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात खुर्ची मारून तिला गंभीर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना पुण्यात गोखले नगर येथे घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी मुलासह त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime
कपिल दीपक सकट, पायल कपिल सकट (वय. २६, दोघे रा. निम्हण मळा, पाषाण) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी यशोदा दीपक सकट (वय. ५५, रा. जनवाडी, गोखलेनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, यशोदा सकट यांचा मुलगा कपिल, त्याची पत्नी पायल, तिची आई आणि मेहुणा हे राहते घर नावावर करून देण्यासाठी यशोदा सकट यांना त्रास देत होते. तसेच यावरून दोन दिवसांपूर्वी कपिल व त्याची आई यशोदा यांच्यात मोठा वाद झाला.
या वादातून मुलगा कपिल याने आई यशोदा यांच्या डोक्यात लकडी खुर्ची मारून त्यांना गंभीर जखमी केले. यात यशोदा या गंभीर जखमी झाल्या आहेत. प्रकरणी मुलासह त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.