Pune Crime : फिंगर प्रिंट घेताना पोस्ट ऑफिसमध्ये अल्पवयीन मुलीशी लगट, आरोपीला बेड्या..


Pune Crime पुणे : आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे फिंगर प्रिंट घेण्याच्या नावाखाली तिच्याशी लगट करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Pune Crime)

ही घटना लोहगावातील एअरपोर्ट पोस्ट ऑफिसमध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

प्रणव कुमार चक्रवर्ती (वय ५५, रा.एकतानगर, लोहगाव) असे करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लोहगावमधील १७ वर्षांच्या मुलीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळलेल्या माहिती नुसार, फिर्यादी या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पोस्ट ऑफिसात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी चक्रवर्ती याने फिर्यादीची फिंगर प्रिंट घेताना शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पीडित मुलीचे विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी चक्रवर्ती याला अटक केली असून पोलिस उपनिरीक्षक चौधरी तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!