Pune Crime : मैत्री तोडल्याने आला राग, मित्राने मैत्रिणीचे अश्लील फोटो केले व्हायरल, गुन्हा दाखल….
Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसेच दिवसेंदिवस फारच पुण्यात विचित्र घटना घडत आहेत. पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणाऱ्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत.
सध्या अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्री तोडल्याच्या रागातून मित्राने मैत्रिणीच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट उघडले. त्यानंतर मैत्रिणीचे अश्लिल फोटो अपलोड करुन अश्लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी २१ वर्षाच्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन कोथरुड पोलिसांनी २४ वर्षाच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला आहे.
सविस्तर माहिती अशी की, पीडित २१ वर्षाच्या तरुणीचीआरोपीसोबत मैत्री होती. त्याच्या वागणुकीमुळे तिने त्याच्याबरोबरील मैत्री तोडली. त्याचा राग मनात धरुन त्याने सोशल मीडियावर तिच्या नावे बनावट अकाऊंट तयार केले. त्यावर तिचे अश्लिल फोटो अपलोड करुन तिला कॉलगर्ल संबोधले. Pune Crime
फिर्यादी हिने त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तिला व्हॉट्सअप मेसेज करत देखील अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलिसात तक्रार केली तर तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली.
आरोपीने फिर्यादी यांचे इंस्टाग्राम , फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करुन तिला कॉलगर्ल असे म्हणून त्यावर तिचा फोन नंबर लिहून बदनामी केली. गुन्हे निरीक्षक विक्रमसिंग कदम तपास करीत आहेत.