Pune Crime : बायकोशी झालेल्या वादाचा झाला विस्फोट, चिडलेल्या जावयाने सासूच्या गाडीसह १५ गाड्या पेटवल्या, पुण्यातील घटना..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दररोज अनेक घटना समोर येत आहे . सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

बायकोशी झालेल्या वादानंतर एका तरुणाने तब्बल १५ गाड्या पेटवल्याची घटना शहरातील सिंहगड रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गणेश दिनकर दहिभाते (वय ३५) असे गाड्या पेटवणाऱ्या जावयाचे नाव आहे. त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, बायकोसोबत झालेल्या वादातून सासरवाडीत आलेल्या जावयाने सासूच्या दुचाकी गाडीसह सासुरवाडीतील रस्त्यावर पार्क केलेल्या तब्बल १५ दुचाकी पेटवल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यामधील सिंहगड रस्त्यावर असलेल्या वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा इमारती समोरील पार्किंग मधील ही घटना आहे. याबाबत महिला फिर्यादीने आपल्या जावयाविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी गणेश दहिभाते यांनी त्याच्या पत्नीसोबत वाद केला होता. Pune Crime

या वादातून फिर्यादी महिलेला आरोपीने हानी पोहोचावे या उद्देशाने जाणीवपूर्वक फिर्यादीची आणि शेजारी असलेल्या पंधरा गाड्या पेटवल्या. या धक्कादायक घटनेने सिंहगड रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या जाळपोळ प्रकरणी आरोपी गणेश दिनकर दहिभाते याच्यावर सिंहगड रोड पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!