Pune Crime : पुण्यात आता कोयता गँगनंतर स्प्रे गँगचा राडा! हादरवणारी माहिती आली समोर…

Pune Crime पुणे : पुण्यात मागच्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने तर धुमाकूळ घातला आहे. त्यानंतर आता पुण्यात कोयता गॅंगनंतर स्प्रे गॅंगने धुमाकूळ घातल्याची माहिती मिळत आहे. Pune Crime
शाळकरी मुला मुलींवर स्प्रेचा फवारा मारत त्यांना त्रास दिला जात आहे. धक्कादायक म्हणजे या स्प्रेमुळे अंगाला खाज सुटणे, सूज येणे असे प्रकार घडत आहेत. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये अवसरी खुर्द या गावात मुला मुलींवर चार अज्ञात फवारा करताना दिसले. तसेचएका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या तोंडावर चार जणांच्या टोळीने स्प्रे मारला.
सोबत असलेल्या मैत्रिणींनी आरडाओरडा केल्याने अज्ञातांनी घटनास्थळावरुन पळ काढला. असाच प्रकारे इतर विद्यार्थ्यांबाबत देखील घडला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांमध्ये या स्प्रे गँगची दहशत आहे. पोलिसांनी या स्प्रे गँगचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. लवकरात लवकर यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी देखील नागरिकांनी मागणी केली आहे.
दरम्यान, आलेले व्यक्ती कुठले आहेत? कुठून येतात याबाबत अद्याप कुठलीही खात्रीशीर माहिती समोर आली नाही. मात्र, गेल्या आठ दिवसात दोन वेळा घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.