Pune Crime : पुण्यात चाललय काय? नाना पेठेनंतर हडपसरमध्ये कोयत्याने वार करुन मॅनेजरला संपवलं, घटनेने खळबळ..


Pune Crime : पुणे शहरात काय चालले आहे? गुन्हेगारी किती वाढली आहे. कोयते हल्ले किती होत आहेत, पुण्यात पोलिसांची दहशत गुन्हेगारांना वाटत आहे का? असे प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती आहे.

पुणे शहरातील मुख्य बाजारपेठ अन् कायम गजबलेला परिसर असलेल्या नाना पेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. त्या घटनेनंतर पुणेकर भयभीत झाले. त्यातून पुणेकर सावरत नाही तोच काही तासांचा आता दुसरी हत्या झाली.

शतपावालीसाठी निघालेल्या पुण्यात फायनस कंपनीत मॅनेजर म्हणून असलेल्या व्यक्तीची हत्या झाली आहे. वासुदेव कुलकर्णी असे या त्या व्यक्तीचे नाव आहे. कुलकर्णी हा एक फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे.

हडपसर भागात वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची रात्री अडीच वाजता हत्या करण्यात आली आहे. ⁠कुलकर्णी हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. Pune Crime

गाडीतळ परिसरात असलेल्या त्यांच्या घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने कुलकर्णी यांचा खून करण्यात आला आहे. ⁠खुनानंतर परिसरात मोठी खळबळ‌ उडाली आहे.

दरम्यान, काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात खूनाची घटना घडली आहे. ⁠खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!