Pune Crime : न्यू इयर पार्टीत मटणावरून राडा!! आधी खाल्ल्याने मित्राने फावड्याच्या दांडक्याने मारलं, पुण्यातील घटना…


Pune Crime : नववर्षानिमित्त आयोजित केल्येल्या पार्टीत आमच्या अगोदर मटण का खाल्ले असे म्हणून मित्रावर फावड्याच्या दांडक्याने मारहाण करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे. हा प्रकार कात्रज येथील नेपाळबाबा मंदिरामागे घडला आहे.

याप्रकणी निंगेश एकनाथ म्हेत्रे (वय. २३, रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धम्मपाल हणमंत सोनवणे (वय. २१, रा. अंजनीनगर, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही वाहनचालक आहेत. काही ड्रायव्हरांनी मिळून पार्टी आयोजित केली होती. पार्टीसाठी मटणाचा बेत आखला होता. चुलीवर मटण शिजत असतानाच निंगेश म्हेत्रे यांनी मटण खाल्ले.

दरम्यान, त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा धम्मपाल याने निंगेश याला शिवीगाळ करुन तेथे असलेल्या फावड्याच्या दांडक्याने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस फौजदार आखुटे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!