Pune Crime : धक्कादायक! सख्या भावाने केले अत्याचार, १४ वर्षाची बहिण गर्भवती, बाळाला दिला जन्म..
Pune Crime पुणे : पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने आपल्या १४ वर्षाच्या बहिणीवर वारंवार लैगिक अत्याचार केला. त्यातून या मुलीने एका बाळाला जन्म दिल्याची खळबळजन घटना समोर आली आहे. Pune Crime
याप्रकरणी मुलीच्या आईने याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी २४ वर्षाच्या मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार मागील एक वर्षांपासून सुरु होता.
मिळलेल्या माहिती नुसार, हे कुटुंब मुळचे कर्नाटक येथील राहणारे आहे. फिर्यादी या धुणे भांड्यांची कामे करतात.
त्यांचे पती व २४ वर्षाचा मुलगा वॉचमन म्हणून काम करतात. तर मुलगी शाळा शिकते.
आई – वडील कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात. याच गोष्टीचा फायदा घेत मोठ्या भावाने या मुलीवर वारंवार लैगिक अत्याचार केला. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. परंतु, तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.
मंगळवारी तिच्या पोटात दुखायला लागले. तेव्हा तिला रुग्णालयात नेले. तेथे ही मुलगी गर्भवती असून तिला प्रसृती कळा येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही वेळातच तिने एका बाळाला जन्म दिला
याप्रकरणी पोलिसांनी मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितोळे करीत आहेत.