Pune Crime : बोपदेव घाटात तरुणीला धमकावून बलात्कार, घटनेने उडाली खळबळ, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..
Pune Crime पुणे : तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी बजरंग जयवंत रुमाले (वय. २१) आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित तरुणीचे आजोबा नांदेड येथे राहायला होते. आजोबांचे निधन झाल्याने ती नांदेडला गेली होती. नांदेड येथे आरोपी रुमालेशी तिची ओळख झाली. आजोबांच्या निधनानंतर तरुणी पुण्यात परतली.
त्यानंतर रुमाले आणि त्याचा मित्र पुण्यात आले. तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीला धमकावून तोंडाला रुमाल बाणून बोपदेव घाटात नेले. तिच्यावर बलात्कार करुन अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.