Pune Crime : सिगारेट आणायला दिला नकार, तरुणाला बेदम मारहाण, कोंढवा परिसरातील धक्कादायक प्रकार….

A young man was brutally beaten


Pune Crime : पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याने तरुणाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन जखमी केले. तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या डोक्यात विटेने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे.

ही घटना रविवारी (ता.२८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवनेरी नगर येथील सार्वजनिक रोडवर घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकणी शाहिद याकुब शेख (वय.१९ रा. शिवनेरी नगर, कोंढवा खुर्द, पुणे) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमर (वय.१९) व इम्रान (वय.२३) पूर्ण नाव माहित नाही दोघे रा.कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्य़ादी शाहिद व त्याचे मित्र आमन व शाहनवाज मोबाईलवर गेम खेळत होते. त्यावेळी आरोपींनी शाहिद याला बोलावून घेऊन ‘तु मला भगवा चौकातून सिगारेट आणून दे’ असे सांगितले. शाहिद याने सिगारेट आणून देण्यास नकार दिला. Pune Crime

याचा राग आल्याने आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन जवळ पडलेल्या लाकडी बाबूने मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी शाहिद याचा मित्र भांडण सोडवण्यासाठी आला. आरोपींनी त्यालाही विटाने हातावर व डोक्यावर मारुन जखमी केले. तसेच बघुन घेण्याची धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!