Pune Crime : तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, लोणीकंद पोलिसांनी आरोपी तरुणाला ठोकल्या बेड्या..

Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील वाघोली परिसरात एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिमुकलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या २५ वर्षीय नराधमाला लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार सोमवारी (ता.२५) दुपारी तीनच्या सुमारास घडला.
याप्रकणी पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार, बालाजी बोयवार (वय.२५ रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. Pune Crime
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्य़ादी या वाघोली येथील एका बांधकाम साईटवर काम करत असून त्याच ठिकाणी राहतात. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी झोपली असताना आरोपी त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.