Pune Crime : पुण्यात मध्यरात्री दुकान फोडलं, चोरांनी चोरली अशी गोष्ट, बघून पोलीसही झाले हैराण, नेमकं काय घडलं?
Pune Crime : पुण्याच्या येरवडा भागात मध्यरात्री हलवायाचे दुकान फोडण्यात आले, पण या चोराने दुकानातून ज्या गोष्टीची चोरी झाली ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या चोरीच्या घटनेची सगळीकडे चर्चा सुरु आहे.
मिठाई विक्रेते शैतान सिंह सवाई सिंह देवडा यांनी याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रर दाखल केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, येरवड्याच्या गोल्फ क्लब रोडवर शैतान सिंह यांचं नारायण स्वीट मार्ट म्हणून दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री चोरांनी दुकानाचं कुलूप तोडलं. दुकानात घुसल्यानंतर चोरांनी फायरिंगही केली.
या चोरांनी गल्ल्यात असलेले ८ हजार ७०० रुपये आणि अडीच किलो आंब्याची बर्फी लंपास केली. सकाळी देवडा दुकान उघडायला गेले तेव्हा त्यांना दुकानाचं कुलूप तोडलेलं दिसलं. हे समजल्यानंतर देवडा यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
देवडा यांच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कुमार शेळके घटनास्थळी दाखल झाले. येरवडा भागात चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. चोर येरवडा परिसरातल्या सोसायटींमधली घरं आणि दुकानांचं निरिक्षण करतात आणि जिकडे सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरा नाही अशा ठिकाणी चोरी करत आहेत. Pune Crime
दरम्यान, येरवडा भागात झालेल्या या अनोख्या चोरीमुळे दुकान मालक, नागरिक आणि पोलीसही हैराण झाले आहेत. चोरांनी एवढी रिस्क घेऊन कुलूप तोडलं आणि ते आंबा बर्फी का घेऊन गेले? असे नागरिक विचारत आहेत.