Pune Crime : भयंकर! मला मूल दे, आई कामावर असताना नराधम बापाचा अल्पवयीन लेकीवर अत्याचार….


Pune Crime  : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती.

‘मला तुझ्यापासून मूल हवे आहे,’ असे म्हणत स्वतःच्या चौदा वर्षांच्या मुलीवर एका बापाने लैंगिक अत्याचार केला होता. लेकीवर अत्याचार करणाऱ्या या नराधम बापाला विशेष न्यायालयाने ‘पोक्सो’ कायद्यानुसार दोषी ठरवून २५ वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

‘मुलीच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या बापानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असून, त्यामुळे मुलीवर गंभीर शारिरीक व मानसिक आघात झाला आहे,’ असे नमूद करुत विशेष न्यायाधीश सोनाली राठोड यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणातील पीडित मुलीने नराधम बापाविरोधात दिलेली साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली होती. या मुलीवर झालेल्या आघाताची भरपाई म्हणून तिला मनोधैर्यसारख्या योजनेअंतर्गत मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले.

‘फाउंडेशन ऑफ चाइल्ड प्रोटेक्शन मुस्कान’ संस्थेने या मुलीला न्याय मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणी पीडितेच्या आईने पतीविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. Pune Crime

ही घटना ऑक्टोबर च्या २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत घडली होती. त्यावेळी पीडिता दहावीत शिकत होती. तिचे वडील बेरोजगार होते. त्यामुळे आईच काम करून घर चालवायची. एके दिवशी पत्नी घरात नसताना पतीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!