Pune Crime : खडकवासला धरणाकडे फिरायला जाऊ म्हणून अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन बलात्कार, गुन्हा दाखल..
Pune Crime पुणे : खडकवासला येथे फिरायला जाऊ असे सांगत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका लॉजवर नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime
आशिष राजेंद्र ताकतोडे (२५, रा. सिंहगड रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. Pune Crime
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र, घटना सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या १६ वर्षीय मुलीसोबत ओळख वाढवली. सप्टेंबर २०२२ मध्ये आशिष तिला खडकवासला येथे फिरण्यास जाऊ, असे सांगून नांदेड सिटी परिसरातील एका लॉजवर घेऊन जाऊन अत्याचार केले.
तसेच लग्न केले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समजताच फिर्यादी यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.