Pune Crime : धक्कादायक! बसची वाट पहात थांबलेल्या लोणी काळभोर येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा..
Pune Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.२२) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हडपसर येथील गाडीतळ बस डेपो येथे घडली आहे.
याप्रकणी लोणी काळभोर येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यारुन १६ ते १८ वयोगटातील चार अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. Pune Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी तिच्या मैत्रिणींसोबत गाडीतळ बस डेपो येथे लोणी काळभोर येथे जाण्यासाठी बसची वाट पहात थांबली होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी मुलीला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केला.
दरम्यान, मुलीने आरोपींना शिवीगाळ केली. याचा राग आल्याने आरोपी तिच्या अंगावर धावून आले. तसेच फिर्य़ादी व तिच्या मैत्रिणींना शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.